गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात असण्याचा इशारा दिला आहे. पाणीपुरवठा करणाऱया पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर खराब झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मंगळवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२२ ते गुरुवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत हाती घेण्यात येणार आहे.


हे ही वाचा - गुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दुरुस्तीच्या या कामामुळे मुंबईमधील व बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱया पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता महानगरपालिका शर्तीचे प्रयत्न करत आहे. (Mumbaikars use water sparingly nz)


हे ही वाचा - काही नेते कार्यकर्त्याला आदेश देता, आमच्याकडे कार्यकर्ता नेत्याला आदेश देतो - बच्चू कडू



दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२२ ते गुरुवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मुंबई महानगरात व बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱया पाणीपुरवठ्यात देखील १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.


हे ही वाचा - मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आधी आपली योग्यता तपासा, नरेश मस्के यांचा आदित्य ठाकरेंना टोला..



अशा वेळेस  बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना विनंती करण्यात येते की, पाण्याचा काटकसरीने वापर करावा, शक्यतो गरज असल्यासच पाण्याचा वापर करावा, आणि दिनांक १ नोव्हेंबर २०२२ ते गुरुवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे.