मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आधी आपली योग्यता तपासा, नरेश मस्के यांचा आदित्य ठाकरेंना टोला..

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. 

Updated: Oct 31, 2022, 09:27 PM IST
मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आधी आपली योग्यता तपासा, नरेश मस्के यांचा आदित्य ठाकरेंना टोला.. title=
Check your competence first while talking about Chief Minister Naresh Maske advice to Aditya Thackeray nz

कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकार ने दिलेल्या आश्वासनांवर बोट दाखवत अनेक प्रश्न शिंदे गटाला केले. त्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी काही तारखा, आकडे जाहीर केले. त्याच्यावरून खात्री झाली आहे की हे प्रकल्प तीन - साडेतीन महिन्यापूर्वीच महाराष्ट्र बाहेर गेलेले आहेत त्यामुळे त्याला कारणीभूत महाविकासआघाडी सरकारच असल्याचे टीकास्त्र नरेश मस्के यांनी सोडले. (Check your competence first while talking about Chief Minister Naresh Maske advice to Aditya Thackeray nz)

हे ही वाचा - गुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश

तुम्ही कोण, तुमचे वय किती, पक्षांमध्ये किती काम केलं असा परखड सवाल करत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी थेट आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले आहे. तुमच्या वयापेक्षा जास्त वर्ष शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी काम केले आहे त्यामुळे आपली योग्यता तपासावी व या संदर्भात माजी मुख्यमंत्र्यांना बोलायला सांगावे असे आवाहन त्यांनी केले. 

पत्रकार परिषद घेऊन याबाबत नरेश म्हस्के म्हणाले, जे प्रकल्प आहेत ते तीन साडेतीन महिन्यापूर्वीच महाराष्ट्र बाहेर गेलेले आहेत. त्याला कारणीभूत तेच आहेत, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही कोण, तुमचं वय किती, पक्षांमध्ये किती काम केलं. तुमचं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त वर्ष या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलंय. आपली योग्यता तपासावी. माजी मुख्यमंत्र्यांना बोलायला सांगा, असा सल्लाही दिला.

हे ही वाचा - काही नेते कार्यकर्त्याला आदेश देता, आमच्याकडे कार्यकर्ता नेत्याला आदेश देतो - बच्चू कडू

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले की, खोके खोके ओरडणार्‍यांच्या मागे आता कॅगची चौकशी लागली असून मुंबई महापालिकेत 12000 कोटी रुपयांची घटनाबाह्य आणि नियमबाह्य कामे करून खोके कुठे लपवून ठेवले आहेत याची विचारणा त्यांनी केली. आपले खोके बाहेर येतील या भीतीने आता महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपण बंद रूमच्या बाहेर कधी आलात नाही त्यामुळे तुम्ही सरकारच्या कमजोरीमुळे सर्व प्रोजेक्ट महाराष्ट्र बाहेर जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.