रायगड : शिडांच्‍या होडया कालबाहय होत असतानाचा मुरूड तालुक्‍यातील राजपुरी खाडीत पर्यटकांना या होडयांच्‍या स्‍पर्धेचा थरार अनुभवायला मिळाला . जंजिरा किल्‍ल्‍यात पर्यटकांची वाहतूक शिडाच्‍या होडीतून केली जाते . या होडीचालकांना विरंगुळा म्‍हणून तसेच पर्यटकांना एक वेगळा आनंद मिळावा, पर्यटन वाढावे या हेतूने जंजिरा  बोट क्‍लबच्‍या वतीने या स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाऱ्याच्‍या वेगाबरोबर कधी पुढे सरकत तर कधी हेलकावे खाणारया होडया म्‍हणजे सर्वांसाठीच एक विलक्षण अनुभव होता. होडीचालकांचे कसब, त्‍याला  वारयाची मिळणारी साथ आणि दुसऱ्या बोटींतून मिळणारी दर्शकांची साथ यामुळे राजपुरी खाडीत उत्‍साही वातावरण निर्माण झाले होते. जिल्‍हा परीषदेचे उपाध्‍यक्ष अॅड. आस्‍वाद पाटील यांच्‍या हस्‍ते स्‍पर्धेचे उदघाटन झाले . या होडयांची परंपरा टिकून रहावी आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी  जिल्‍हा परीषेदेने निधीची तरतूद केली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले .