विरार: कोरोनाच्या संकटकाळात विरारमध्ये एका मुस्लिम युवकाकडून माणुसकीचे दर्शन घडल्याची घटना समोर आली आहे. विरार पूर्व गोपचरपाडा येथील मराठी शाळेजवळ राहणाऱ्या अरविंद डांगे या चाळीस वर्षीय व्यक्तीचे आज दुपारी निधन झाले. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे नातेवाईक किंवा आजुबाजूचे लोक अंत्यसंस्कारासाठी आले नाहीत. त्यामुळे डांगे कुटुंबीय एकाकी पडले होते. त्यांची ही अडचण ओळखून याच परिसरात राहणाऱ्या नावेद खान या तरुणाने शेजाऱ्यांना सोबत घेऊन अरविंद डांगे यांच्या अंत्यसंस्काराची तयार केली. यानंतर नावेदने त्यांच्या पार्थिवाला खांदाही दिला. त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यातच 'त्या' मजुराची तब्येत बिघडली, पण मित्राने शेवटपर्यंत साथ दिली


सध्या लॉकडाऊनमुळे लोकांना आप्तेष्टांच्या अंत्ययात्रेलाही जाणे अवघड झाले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अंत्ययात्रेसाठी मोजक्या लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे लोकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. 


...अखेर 'त्या' महिलेच्या मृतदेहाला पोलिसांनी दिला खांदा


लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्य सरकारकडून रेड झोन वगळता इतर भागातील निर्बंध काहीप्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. सर्वाधिक महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वीचे झोन म्हणजे ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन रद्द करुन यापुढे रेड झोन, नॉन रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन अशा स्वरुपात ही विभागणी करण्यात आली आहे.