शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : देशातील मुस्लिम तरुणांवर 'मॉब लिचिंग'च्या माध्यमातून होणारे वाढते हल्ले तात्काळ रोखवेत या मागणीसाठी लातूरमधील मुस्लिम आज रस्त्यावर उतरले. काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये जय श्रीराम आणि जय हनुमान अशा घोषणा देण्यासाठी तबरेज अन्सारी या तरुणाला मारहाण करून त्याचा बळी घेतला होता. अशा पध्दतीने २० हून अधिक मुस्लिम तरुणांचा 'मॉब लिचिंग'मध्ये बळी गेला आहे. याच्या निषेधार्थ लातूरच्या गांधी चौकात मुस्लिम नागरिकांनी निदर्शने केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



शुक्रवारची नमाज करून या नागरिकांनी शांततेच्या मार्गाने निदर्शने केली. तसेच मुस्लिम समाजासाठी अट्रोसिटीचे कवच सरकारने देण्याची मागणी यावेळी प्रमुख आंदोलक मोहसीन खान यांनी केली. नरेंद्र मोदी सरकारच्या काळात निरागस, निर्दोष मुस्लिम समाजातील नागरिकांवर हल्ले होत आहेत. हे हल्ले तात्काळ रोखावेत तसेच मुस्लिम अट्रोसिटीचे कवच द्यावे अशीही मागणी यावेळी मुस्लिम धर्मियांनी केली.