रत्नागिरी : अरुणाचल प्रदेश येथे पूरग्रस्तांना वाचवताना शहीद झालेल्या राजेंद्र गुजर यांच्या कुटुंबाला नाम फाऊंडेशनने मदतीचा हात दिला आहे. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकरी आणि सैनिकांसाठी स्थापन केलेल्या नाम फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहीद राजेंद्र गुजर यांच्या पालवणी जांभूळनगर येथील घरी जाऊन वीरमाता राधाबाई गुजर यांना मदतीचा अडीच लाखांचा धनादेश सुपूर्द केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरुणाचल प्रदेशमध्ये पूरग्रस्तांना मदत करीत असताना गेल्या महिन्यात भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. यामध्ये एकूण चार जण होते, त्यापैकी सर्वांचा मृत्यू झाला. त्यामध्ये राजेंद्र गुजर यांना वीरमरण आले होते.