Nagmani Story: नाग, नागिणीकडे खरंच नागमणी असतो? काय आहे या रहस्यमयी रत्नाचे सत्य?
Nagamani Story: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. याच दरम्यान नागपंचमीचा सणही साजरा केला जातो.
Nagamani Story: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. याच दरम्यान नागपंचमीचा सणही साजरा केला जातो. नागपंचमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरम्यान, आपल्याकडे सांगितल्या जाणाऱ्या लोककथांमधला इच्छाधारी नाग हे एक प्रसिद्ध पात्र आहे. नाग एक असा सर्प आहे जो पाहिजे तेव्हा रूप बदलू शकतो, पाहिजे तेव्हा सापातून माणूस बनू शकतो, असे त्या कथेत सांगितले जाते. त्याही पुढे जाऊन इच्छाधारी नागाच्या अनेक कथा रंगवून सांगितल्या जातात. नागमणीच्या कथादेखील याच पठडीतल्या असतात. नागमणी मिळवण्यासाठी तांत्रिकांना इच्छाधारी नाग जोडप्याला मारायचे असते, असे सांगितले जाते. विशेष म्हणजे आपल्याकडच्या सिनेमांमध्येदेखील असेच चित्र रंगविले गेले आहे. त्यामुळे ही कथा अनेकांच्या मनात घर करुन बसली आहे.
जीवशास्त्रज्ञ नागमणीची शक्यता नाकारतात. सापाच्या डोक्यात असा कोणताही धातू आढळत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. काल्पनिक कथांमध्ये, लोक साप आणि नागांच्या कथांचा उल्लेख करतात. ना सर्परत्न आहे, ना सापाकडे असे कोणतेही रत्न आहे, ज्यात अलौकिक शक्ती आहे.
इच्छाधारी नागीणीचे सत्य काय आहे?
जीव वैज्ञानिकांनी नागमणीच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.असे काही खरेच असते तर वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या लोकांनी ते नक्कीच पाहिले असते. त्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाणारी ही केवळ दंतकथा आहे. कोणत्याही सापामध्ये नागमणी सारखा प्रकार घडत नाही. हे एक मिथक आहे. कोणत्याही सापामध्ये नागमणी नसतो, असे वैज्ञानिक सांगतात.
नागमणीवर पुराण काय सांगतात?
काही पौराणिक कथांमध्ये नागमणीचा उल्लेख आढळतो. पुराणात नागलोकाचाही उल्लेख आहे, जिथे साप इच्छेनुसार आकार घेऊ शकतात. महाराज जनमेजयाला डंख मारणारा नागराज तक्षकही मानवाचे रूप घेऊ शकतो, असा उल्लेख पुराण कथांमध्ये आहे.
भागवत कथांमध्ये नागमणीचा उल्लेख आहे. पुराणातही सर्पमित्राच्या घटना समोर येतात. वृहतसंहितेतही नागमणीचे गुण सांगितले आहेत. असे म्हणतात की, नागमणीला अद्भुत चमक असते, ज्याच्याकडे हे रत्न आहे, त्याला अलौकिक शक्ती प्राप्त होते, अशी कथादेखील सांगितले जाते.
दोन नागपंचमी
श्रावण महिन्यात दोन नागपंचमी तिथी आहेत. एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष. जाणून घेऊया यावेळी नागपंचमी कधी आहे.
नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची विशेष पूजा केली जाते. यामध्येही शुक्ल पक्षातील नागपंचमी तिथीला अधिक महत्त्व आहे. नागाला दुधाचा अभिषेक दिला जातो. यावेळी कृष्ण पक्षातील नागपंचमी 7 जुलै आणि शुक्ल पक्षातील नागपंचमी 21 ऑगस्ट रोजी आहे.
कृष्ण पक्ष म्हणजेच ७ जुलैला साजरी होणारी नागपंचमी फक्त राजस्थान, बिहार आणि झारखंड या राज्यांमध्येच राहील. देशातील बहुतांश भागात नागपंचमीचा सण २१ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.