अमर काणे, झी मीडिया, नागपूर : पारंपपारिक सण साजरे करताना उपराधानीनं आपलं वैशिष्ट जोपासले आहे. मग तान्हा पोळ्याला निघणारी मारबत व बडग्या असो वा नागपंचमीला होणारी होणारी लिंबू फेक शर्यत.. नागपुरात भोसले काळापासून लिंबू फेक शर्यत शहरातील जुन्या परिसरांमध्ये मोठ्या जोमात होते. महाल, इतवारी परिसरात आता लिंबू फेक खेळताना फारसं कुणी दिसत नसलं तरी तांडापेठ,गोळीबार चौक येथे आजही तेवढ्याच उत्साहात तरुणवर्ग खेळला लिंबूफेक फेकसाठी चुसर दिसून येते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपराजधानीत अजून  विविध सण रूढी, प्रथा परंपरांचे जतन करताना उत्साहात साजरा करण्यात येतात. नागपंचमीही सण साजरा करताना विदर्भात त्यातही पूर्व विदर्भाने आपले वेगळेपण जोपासले आहे. नागपंचलमीला शहरात पारंपारिक पद्धतीने लिंबू फेक शर्यती अनेक ठिकाणी होते. ठराविक अंतरापर्यंत लिंबू फेकायचे असे या शर्यतीचे साधारण स्वरूप असते. त्याकरता वयोमर्यांदा नसते.


साधारणता एक हात , पण एक हात, दोन हात, तीन हात आणि साडेतीन हात अशा विविध टप्प्यांमध्ये लिंबू फेकची ही शर्यत होत असते. पूर्ण फेक ही आपल्या वापरात असलेल्या अर्थात उजव्या हाताने आणि अर्ध फेक ही डाव्या हाताने असते. शहरातील ,तांडापेठ,गोळीबार चौक, या परिसरात अजूनही नागपंचमीला तरुण मोठ्या उत्साहात लिंबू फेक शर्यती खेळता.


लिंबू फेक शर्यतीमागे काय आहे अख्यायिका ?


लिंबू फेकच्या या शर्यतीमागे वेगवेगळ्या अख्यायिका सांगण्यात येतात. एका अख्यायिकेनुसार मध्य प्रदेशमधील पंचमढी येथे छोटा नागद्वारजवळील एका गुहेत शिव-पार्वतीचे एक छायाचित्र आहे. तळ्यामामधून छायाचित्रातील शंकर पार्वतीच्या चरणापाशी ज्याचे लिंबू लागेल तो पुण्यवान आणि ज्याचे लिंबू  शंकर पार्वतीच्या छायाचित्रापर्यंत पोहचले नाही तो जीवनात अयशस्वी अशी धारणा आहे. त्यातूनच लिंबू फेकची ही पद्धत सुरु झाली.णि नंतर ती आपल्याकडे आली असावी अशी अख्यायिका आहे.  तर अजून एका अख्यायिकेनुसार श्रेष्ठ कोण यावरुन मांत्रिकांमध्ये वर्चस्व सिद्ध करण्यासाठी चढोओढ होती.  लिंबूने आपल्यावरील पिडा टळते असा समज असल्याने आणि मांत्रिक एकमेकांवर लिंबू फेकू लागले. ज्याचे लिंबू दुसऱ्याला मांत्रिकाला सर्वाधिक लागेल तो मांत्रिक श्रेष्ठ असे मानले जाऊ लागले. त्याच अंधश्रद्धेतून श्रेष्ठत्व  सिद्ध करण्यातून ही लिंबू फेक स्पर्धा सुरु झाल्याचे सांगण्यात येते.