पूर्ववैमनस्यातून २२ वर्षीय तरुणाची हत्या
नागपूरमध्ये पुन्हा एकदा हत्येची घटना घडलीय. एका बावीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आलीय.
नागपूर : नागपूरमध्ये पुन्हा एकदा हत्येची घटना घडलीय. एका बावीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आलीय. कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत गोंडखैरी गावात जिल्हा परिषद शाळेत नंदू भोसले या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय. अज्ञात मारेकऱ्यांनी नंदू भोसले याची हत्या केलीय. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. गेल्या काही दिवसात राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीय. हत्या, दरोडा, लूट, जाळपोळ अशा घटना नागपुरात वाढल्यात. त्यामुळे राज्याची उपराजधानी क्राईम कॅपिटल बनली आहे का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.