नागपूर : विकासनिधीच्या मागणीसाठी शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या दालनात धडक दिली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ तीन मिनिटांत बैठक संपवली. आश्वासनाशिवाय शिवसेनेच्या आमदारांना काहीही मिळालेले नाही. दरम्यान, १०० कोटींच्या निधीचे आश्वासन पूर्ण न केल्यास कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा शिवसेना आमदारांनी दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरमध्ये शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात धडक दिली. मतदारसंघातल्या विकास कामांसाठी कबूल केलेला १० कोटींचा निधी द्या, अशी शिवसेना आमदारांची मागणी आहे. निधी देण्याबाबत ठोस आश्वासन मिळालं नाही, तर कामकाजात सहभागी होणार नाही, असा इशारा शिवसेना आमदारांनी दिलाय. 



निधी देण्यामध्ये मुख्यमंत्री दुजाभाव करत असल्याचा शिवसेना आमदारांचा आरोपआहे. वर्षभर पाठपुरावा करूनही आणि आश्वासन देऊनही निधी मिळत नसल्याने शिवसेना आमदार संतप्त झालेत. मात्र, पुन्हा शिसेनेच्या पदरी आश्वासनच मिळालेय. त्यामुळे हा निधी मिळणार की नाही, याची उत्सुकता आहे.