नागपूर : कोरोनाचा coronavirus प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला असताना आता नागपुरातही या विषाणूचा संसर्ग अतिशय झपाट्यानं वाढू लागल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. सध्याच्या घडीला, नागपुरात कोरोनाबळींची संख्या दोन हजारांच्याही पलीकडे गेली आहे. नागपुरात पहिले एक हजार कोरोनाबळी १७२ दिवसांत गेले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या एक हजार कोरोनाबळींमागोमाग या विषाणूची लागण झाल्यामुळं दगावलेल्या दुसरे एक हजार कोरोनाबळी अवघ्या २० दिवसांत गेले आहेत. त्यामुळं नागपुरात कोरोनाचा विळखा आणि प्रकोप किती भयावह झाला आहे हे दिसून येत आहे. दरम्यान रविवारी नागपुरात १ हजार २२६ नवे कोरोना पॉझिटीव्हही आढळले आहेत. ५४ जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे. रविवारी या ठिकाणी ६ हजाराहूनही कमी चाचण्या करण्यात आल्या. दरम्यान, सध्या येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६३ हजार ७५७ इतकी झाली आहे. तर, आतापर्यंत २ हजार ४४ जणांचा यात बळी गेला आहे.


५१ हजारहून अधिक कोरोनामुक्त.... 


नागपूरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रविवारी नागपुरात कोरोनाबळींचा आकडा दोन हजारांच्याही पलीकडे गेला आहे. नागपुराता पहिला कोरोनाबाधित ११ मार्च २०२० ला सापडला होता. ज्यानंतरपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव इथं प्रचंड वेगानं वाढत चालल्याचं चित्र आहे.


 


दररोज बाधितांच्या संख्येसोबतच बळींच्याही संख्येमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मार्च ते ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात १०४५ बळींची नोंद करण्यात आली होती. मात्र सप्टेंबरमध्येच कोरोनानं नागपूरकरात थैमान घातलं आहे. नागपुरला सुरुवातीचे मार्च ते जुलैपर्यंत कोरोनामृत्यूची संख्या कमी होती. पण, ऑगस्ट आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये कोरोनाचा उद्रेकच होताना दिसून येत आहे. यामुळे वेळीच उपचार घेत नसल्याने मृत्यूंचीही संख्या वाढत चालल्याचं सांगितलं जात आहे.