अमर काणे, झी मीडिया, नागपूर nagpur crime news: हल्ली अनेकदा असे प्रकार घडत असतात ज्यांना आळा घालणं कधीकधी अशक्य (Shocking Incidents) होतं. खासकरून आपल्या अन्नाशी कोणी छेडछाड करत असेल तर आपल्यासाठी ही बाब अधिक गंभीर होऊन जाते. सध्या नागपूरात (Nagpur) असाच एक धक्कादायक प्रसंग घडला आहे. हा प्रसंग वाचून तुम्हाला संताप आल्याशिवाय राहणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

70 रुपये किलोचा शेंगदाणा (Peanuts) प्रक्रिया करून पिस्ताच्या (Pista) नावाखाली 1,100 रुपये किलो रुपये दराने विक्री करणाऱ्या रॅकेटचा (Racket) नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.मनोज नंदनवार व दिलीप पौनीकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या (Police) हद्दीत एका वाहनचालकाला संशयावरून ताब्यात घेत ल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. याप्रकरणी पोलिसांनी 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धक्कादायक म्हणजे हा बनावट पिस्ता शहरातील अनेक मिठाई (Sweets Shop) कारखान्यांना पुरवठा व्हायचा अशी माहिती ही तपासात पुढे येत आहे.


हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल


एम्प्रेस मॉल जवळ पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना एक इसम संशयास्पदरित्या आढळला. पोलिसांना त्याच्याकडे पोत्यामध्ये शेंगदाण्यावर प्रक्रिया करून तो नकली पिस्ता विक्रीसाठी जात असल्याचे आढळून आल. याप्रकरणी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दिलीप पौनीकर यांच्याकडून माल घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी पौनीकर यांच्या कारखान्यावर (Factory) धाड टाकली असता ,तेथे नकली पिस्ता तयार करण्याचे काम सुरू होते.


हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा 


त्याच्याकडून सात लाखांचा नकली पिस्ता व यंत्र जप्त केले आहे.पौ नीकर कडून मोठ्या प्रमाणात ही भेसळ करण्यात येत होती.बाजारातून शेंगदाणे घेऊन तो उकडायचा. त्याला वाळविलल्यानंतर यंत्राच्या साह्याने कापणी करून परत वाळवून पिस्त्याचे रूप देत. हा नकली पिस्ता (Pista News) तो शहराच्या अनेक मिठाई कारखान्यानाही पुरवायचा.