नागपूर : देश इतक्या वाईट परिस्थितीतून जात असताना, डॅाक्टर आणि आरोग्य कर्मचारी आपला स्वत:चा विचार न करता जनतेच्या सेवेत गुंतले आहेत. त्यामुळे लोकं डॅाक्टरांना देव मानत आहेत आणि त्यांची पूजा करत आहेत. अशातच एका डॉक्टरने आपल्या महिला सहकारीवर शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव आणत तो देव नसून एक हैवान आहे हे सिद्ध केले आहे. त्या डॅाक्टरने त्याच्याबरोबर काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरवर रुग्णालयात बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा लगेचचं मिळाली आणि त्याने थेट लॉकअप गाठला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना नागपूरच्या कोराडी रोड येथील आहे. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी डॉक्टरला अटक केली आहे आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचारासह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर नंदू रहंगाडाले असे त्या अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.


नागपुरात असलेल्या या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक महिला डॉक्टर सेवेत रुजू झाली. सुरुवातीपासूनच आरोपी डॉक्टरची घाणेरडी नजर या महिला डॉक्टरवर होती. ही महिला डॉक्टर सोमवारी रात्री तिच्या केबिनमध्ये असताना आरोपी डॉक्टर तिच्या केबिनमध्ये आला आणि शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करू लागला.


त्या महिला डॉक्टरने त्याला नकार दिला. त्यानंतर, डॉक्टर अश्लील कृत्य करु लागला आणि त्या महिला डॉक्टरवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करू लागला. महिला डॉक्टरने त्याला जोरात ढकलले आणि केबिनच्या बाहेर पळाली.


वरिष्ठ निरीक्षकांनी सूचना दिल्या आणि आरोपीला अटक


स्वत: चा बचाव केल्यानंतर महिला डॉक्टरने मनकापूर पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधारे यांच्या सूचनेवरून मानकापूर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली.


यापूर्वीही अजनी भागातील एका डॉक्टरने 19 वर्षाच्या परिचारिकेशी अश्लील कृत्य करून शारीरिक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आठवड्यातली ही दुसरी घटना आहे. कोविड युगात पुरुष डॉक्टरांसमवेत महिला डॉक्टरही कठोर परिश्रम करुन कोरोना रूग्णांची सेवा करत आहेत. त्यांपैकी बरेच जण दिवस रात्र म्हणजे डबल शिफ्टमध्ये काम करत आहेत.


देश, समाज आणि राज्याच्या सेवेत महिला डॉक्टरही पुरुष सहकाऱ्यांसोबत काम करण्यास तयार आहेत, परंतु किमान त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे असे या रुग्णालयाच्या महिला डॉक्टरांचे म्हणणे आहे.