दुहेरी हत्याकांड़ प्रकरणात संशयित पोलिसांच्या ताब्यात
गणेश शाहू असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव असून तो किराणा दुकानाचा मालक आहे. गणेश शाहूच्या घरात रक्ताचे डाग आढळले
नागपूर : नागपुरातील पत्रकाराच्या आई आणि मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. गणेश शाहू असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव असून तो किराणा दुकानाचा मालक आहे. गणेश शाहूच्या घरात रक्ताचे डाग आढळले
सोनाराकडे जातो असे सांगून घरून निघाल्या
नागपूरच्या दिघोरी परिसरातील पवननगर येथे राहणारे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आई उषा आणि दीड वर्षाची चिमुकली मुलगी राशी कांबळे शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता होत्या. सोनाराकडे जातो असे सांगून घरून निघालेल्या उषा आणि राशी या घरी परतल्याच नाही.
'शिव किराणा' दुकानात शेवटचे पाहण्यात आले
सोनाराकडून परत येताना कांबळे राहत असलेल्या पवन नगर परिसरातीलच 'शिव किराणा' दुकानात शेवटचे पाहण्यात आले होते. यावरून पोलिसांनी शिव किरण दुकानाचा मालक गणेश शाहू याचाकडे विचारपूस केली.
घरात आणि बाथरूममध्ये पोलिसांना रक्ताचे डाग
चौकशीत शाहू याचा कारमध्ये, घरात आणि बाथरूममध्ये पोलिसांना रक्ताचे डाग सापडले. संशयाच्या आधारावरून पोलिसांनी गणेश शाहूला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
विहीरगाव परिसरातील नाल्यात मृतदेह
स्थानिक वेब पोर्टलचे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आई आणि मुलीचा मृतदेह रविवारी सकाळी विहीरगाव परिसरातील नाल्यात आढळला होता. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.