Nagpur Lok Sabha Nikal 2024: नागपुरात नितीन गडकरी हॅटट्रिक करणार का? विदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
नागपूर लोकसभा निकाल 2024: राज्याची उपराजधानी आणि भाजपचा बाल्लेकिल्ला नागपूरमध्ये भाजपकडून नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत होती. यात गडकरी आघाडीवर असून विदर्भातील इतर मतदारसंघात काय स्थिती आहे जाणून घ्या.
Nagpur Lok Sabha Election Result 2024 News In Marathi: लोकसभा निवडणूक 2024 चा मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नागपूरमधून नितीन गडकरींना तिसऱ्या फेऱ्यांमध्ये 1 लाख 19 हजार 848 मतं पडली असून विकास ठाकरेंना 1 लाख 44 हजार 450 मतं मिळाली आहेत. नितीन गडकरी 47 हजार 398 मतांनी आघाडीवर आहेत.
नागपुरात वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळे तिथे दुहेरी लढत झाली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला नागपुरात 47 टक्के मतदान झालं. विदर्भातील नागपूर मतदारसंघ सर्वात प्रतिष्ठेची मानली जाते. कारण नितीन गडकरी तिसऱ्यांदा हॅटट्रिक करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
लोकसभा निवडणुकीची प्रत्येक अपडेट - Maharashtra Nivadnuk Nikal 2024 LIVE: मुंबईतून ठाकरे गटाच्या 'या' उमेदवाराला 10000+ ची आघाडी
कधी काळी नागपूर हा काँग्रेसचा गड समजला जायचा. 1952 मधील पहिली लोकसभा निवडणूकपासून या नागपुरात दीर्घकाळ काँग्रेसचं वर्चस्व पाहिला मिळालं. अनुसयाबाई काळे या काँग्रेसकडून दोन वेळा खासदार झाल्या. त्यांच्या नंतर दोन वेळा खासदार होण्याचा मान नितीन गडकरी यांना मिळाला. पण 72 वर्षांत काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार हेच एक त्यांनी सलग तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकले.
नितीन गडकरी यांनी यंदा लोकसभा निवडणूक 2024 मध्ये देशभरात चांगल्या आणि वेगळ्या विकासकामांच्या जोरावर मतदारांना आपला खासदार निवडा अशी विनंती केली. गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना तब्बल 2,16,009 मतांनी पराभव करुन दुसऱ्यांदा ही निवडणूक जिंकली होती.
देशाची कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर प्रत्येक अपडेट - Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: मध्य प्रदेशात भाजप विरोधकांना क्लीन स्वीप देण्याच्या मार्गावर; देशभरातील निकाल कुणाच्या बाजुनं?
यंदा नितीन गडकरींची विजयाची घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेसने शहराध्यक्ष विकास ठाकरेंना रिंगणात उतरवलं होतं. गेल्या 10 वर्षांमध्ये ठाकरे यांनी राजकीय अनुभव आणि पक्ष संघटनेच्या जोरावर काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. ठाकरे यांनी महापालिकेची निवडणूक पाच वेळा लढली त्यातील तीन वेळा ते विजयी झाले. तर विधानसभेची निवडणूक ते तीन वेळा लढले आणि त्यातील एकाच मध्ये त्यांचा विजय झाला. राजकीय कारकीर्दीत ते नवव्यांदा नितीन गडकरीविरोधात रिंगणात उतरले.