Maharashtra Election LIVE: - बीडमध्ये धक्कादायक निकाल! भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी पाहा एकाच क्लिकवर...

Maharashtra Election LIVE: - बीडमध्ये धक्कादायक निकाल! भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडला. लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. याच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी आज निकालाच्या दिवशी दिवसभर या लिंकवर पाहता येणार आहे. राज्यात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर, कोणी उधळला विजयाचा गुलाल तर कोणाला पहावं लागलं पराभवाचं तोंड? या साऱ्या अपेड्ट या एकाच लिंकवर उपलब्ध असून लाइव्ह अपेड्टसाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

4 Jun 2024, 22:16 वाजता

बीडमधून धक्कादायक निकाल समोर आला आहे. भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना पराभवाची चव चाखायला लागली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे विजयी झाले आहेत. 

4 Jun 2024, 20:10 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'सत्ता स्थापन...'

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे शिवसेना भवनात येऊन आपली पहिली प्रतिक्रिया दिली.  हा निकाल म्हणजे देशात सर्वसामान्य माणसाने ताकद दाखवून दिली आहे. सत्ता स्थापनेचा प्रयत्न केलाच पाहिजे असं ते म्हणाले. तर भाजपवर चिडलेले लोक आमच्यासोबत येतील. सुडाच्या राजकारणाला कंटाळलेले इंडिया आघाडीत येतील. उद्या संध्याकाळी दिल्ली जाईल असंही त्यांनी सांगितलं. 

4 Jun 2024, 19:28 वाजता

फेरमतमोजणीत ठाकरे गटाचे अमोल किर्तिकर पराभूत घोषित. रविंद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी.

 

4 Jun 2024, 18:06 वाजता

Results 2024: खडसेंनी भाजपाचेच कान टोचले! महायुतीच्या अपयशावर म्हणाले, 'महाराष्ट्राच्या जनतेला फोडाफोडीचं..'

रावेर मतदारसंघातून महायुतीच्या रक्षा खडसे विजयी होणार असं निश्चित मानलं जात आहे. मतमोजणीच्या सतराव्या फेरीनंतर रक्षा खडसेंनी 1 लाख 95 हजार 46 हजार मतांनी आघाडी मिळवली आहे. 17 व्या फेरीनंतर रक्षा खडसेंना 4 लाख 71 हजार 14 मतं होती. तर महाविकास आघाडीच्या श्रीराम पाटील यांना 2 लाख 75 हजार 968 मतं मिळाली. सुनेने आघाडी घेतल्यानंतर भाजपाच्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. महाविकास आघाडी सरकारला एवढं यश का मिळालं यासंदर्भात एकनाथ खडसेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...

4 Jun 2024, 17:15 वाजता

Maharashtra Lok Sabha Winner List: महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; वाचा येथे क्लिक करुन

 

4 Jun 2024, 17:01 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: वर्षा गायकवाड विजयी! अमोल किर्तीकरांनीही बाजी मारली

वर्षा गायकवाड उत्तर-मध्य मुंबईमधून जिंकल्या भाजपाचे उज्वल निकम पराभूत झाले आहेत. तसेच अमोल किर्तीकर उत्तर-पश्चिम मतदारसंघातून विजयी झाले आहेत. अमोल किर्तीकरांनी शिंदे गटाच्या रविंद्र वायकरांचा पराभव केला आहे. 

4 Jun 2024, 16:21 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: अकोल्यात 21 फेऱ्यांनंतरही प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानी

अकोला मतदारसंघामध्ये 21 व्या फेरीमध्ये भाजपचे अनुप धोत्रे 23348 मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे अभय पाटील दुसऱ्या क्रमांकावर तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर.

4 Jun 2024, 16:14 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: | पुणे लोकसभेतून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विजय, तर मविआचे रवींद्र धंगेकर, आणि वंचितचे वसंत मोरे यांचा पराभव

4 Jun 2024, 16:01 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: तब्बल 2 लाखांची आघाडी! काँग्रेसची महिला उमेदवार ठरणार 'जायंट किलर'

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर 19 व्या फेरीअखेर दोन लाखांनी आघाडीवर आहेत. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. त्या भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करतील असं चित्र सध्या तरी दिसत आहे.

 

4 Jun 2024, 15:53 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: भाजपाला आणखी एक धक्का? बालेकिल्ल्यात शरद पवारांचा उमेदवार आघाडीवर

भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अहमदनगर मतदारसंघातून 15 फेरीनंतर शरद पवार गटाचे निलेश लंकेंनी 14849 मतांची आघाडी मिळवली आहे. निलेश लंकेंना 3 लाख 61 हजार मतं मिळाली असून भाजपाच्या सुजय विखे पाटलांना 3 लाख 51 हजार 320 मतं मिळाली आहे.