nagpur man robbed for rs 16 lakh by online fraud: कंपनीची फ्रेंचायझी घेण्यासाठी गुगल सर्च करणं एका नागपूरकराला (nagpur) फारच महागात पडलं आहे. या तरुणाला एका फूड प्रोडक्टची फ्रेंचायझी देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या तरुणाला तब्बल 16 लाखांचा (rs 16 lakh) गंडा (online fraud) घालण्यात आला आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.


गुगलवर सापडला नंबर अन्...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे प्रकरण नागपूरमधील उपनगर असलेल्या कामाठी येथील येरखेडा गावातील आहे. येथील राहुल मुपीडवार या तरुणाने फूड फ्रेंचायझी घेण्याचा विचार केला. त्यासाठी त्याने गुगलवर सर्च केलं. त्यावेळी त्याला या फूड प्रोडक्ट कंपनीच्या फ्रेंचायझीसंदर्भातील माहिती मिळाली. या क्रमांकाच्या माध्यमातून ऑनलाइन माहिती घेण्यासाठी राहुलने संपर्क साधला. राहुलला या क्रमांकावरुन फूड कंपनीचा प्रतिनिधी म्हणून एक कॉल आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव उमेंद्र लहरे असल्याचं सांगितलं. 


वेळोवेळी मागितली रक्कम


उमेंद्र नावाच्या या व्यक्तीने आपण स्वत: या फूड कंपनीचे मालक असल्याचं राहुलला सांगितलं. राहुलला फ्रेंचायझी देण्याची ऑफरही या व्यक्तीने दिली. त्यानंतर या व्यक्तीने राहुलला 15,500 रुपये मी सांगतो त्या खात्यावर जमा कर असं सांगितलं. राहुलने सांगितल्याप्रमाणे या व्यक्तीच्या खात्यावर पैसे पाठवले. त्यानंतर वेगवगेळ्या कारणांसाठी वेळोवेळी छोटी-मोठी रक्कम मागत या व्यक्तीने राहुलकडून तब्बल 15 लाख 71 हजरांची रक्कम घेतली. जवळजवळ 16 लाख रुपये देऊनही फ्रेंचायझीसंदर्भातील विषय पुढे सरकरत नसल्याचं राहुलच्या लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्याला जाणवलं. त्याने कामाठी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 


मोठं रॅकेट असण्याची शक्यता


कामाठी पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार राहुलबरोबर झालेल्या फसवणुकीसंदर्भात लेखी तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस सध्या उमेंद्र लहरे नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. तसेच पोलीस याचाही तपास करत आहे की लहरे नावाच्या या व्यक्तीने राहुलप्रमाणे इतरांनाही गंडा घातलेला आहे का. हे एखादं मोठं रॅकेट असू शकतं अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.