Nagpur News : एका अल्पवयीन मुलीसोबत धावत्या रेल्वेमध्ये घडलेल्या गैरप्रकारामुळं सध्या रेल्वे यंत्रणा आणि नागपूर हादरलं आहे. उपलब्ध माहितीनुसार पाटलीपूत्र एक्स्प्रेसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून, एका कोच अटेंडन्टनं 9 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीनं आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं असल्याचं लक्षात येताच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि मग... 


पाटलीपूत्र एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक 75 वर्षीय महिला त्यांच्या मुलीसह आणि नातू, नातीसह पाटलीपूत्र एक्स्प्रेसमधून प्रवास करत होत्या. रेल्वे नागपूरनजीक असतानाच त्यांची 9 वर्षीय नात शौचालयाच्या दिशेनं गेली. त्यावेळी रात्रीचे 1 ते 1.30 वाजले होते. दरम्यानच्या वेळेत डब्यातील इतर प्रवासी गाढ झोपेत होते.


नागपूरच्या बुटीबोरीनजीक पाटलीपूत्र एक्स्प्रेस (Rape Attempt in Patliputra Express) आली असता (Indian Railway) रेल्वेमधून प्रवास करणारी 9 वर्षीय चिमुकली लघुशंकेला गेली. बऱ्याच वेळापासून तिच्यावर डोळा असणारा कोच अटेंडन्ट तिच्या मागे गेला आणि ती शौचालयात असतानाच त्यानं एक क्षणही न दवडता शौचालयाचं दार ढकलून आतमध्ये गेला आणि त्यानं दार आतून बंद करून घेतलं. त्या नराधमानं पीडितेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. भीतीपोटी आणि मदतीच्या अपेक्षेनं ती जोरजोरात ओरडू लागली. आरोपी घाबरला आणि त्यानं तिला पैशांचं आमिष दाखवत अश्लील चाळे सुरुच ठेवले. त्यानं जेव्हा शौचालयाचं दार उघडलं तेव्हा मुलगी जीवाच्या आकांतानं तेथून पळाली. 


मुलगी शौचालयाकडे जाऊन बराच उशीर झाला तरीही परतली नाही, म्हणून तिची आई शौचालयाच्या दिशेनं गेली. आईला पाहताच ती चिमुकली किंकाळत पुढे आली आणि तिनं झाला प्रकार आईपुढं सांगितला. संतापाच्या भरात आईनं आकांत केला आणि सहप्रवाशांना  मदतीसाठी हाक दिली. घडल्या प्रकरणाची माहिती मिळताच संतप्त सहप्रवाशांनी आरोपीला बेदम मारहाण केली. 


हेसुद्धा वाचा : म्हाडा लॉटरीमध्ये तुमचं नशीब फळफळणार? पाहा सोडतीसंदर्भातली सर्वात मोठी बातमी 


पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार मोहम्मद मुन्ना (50) असं आरोपीचं नाव असून, तो मुळचा बिहारच्या गया येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येतं. गेल्या 8 वर्षांपासून तो रेल्वे कोचमध्ये अटेंडन्ट म्हणून काम करत होता. यावेळी बंगळुरू पाटना पाटलीपूत्र एक्स्प्रेसच्या AC 3 Tier B-2 कोचमध्ये तो काम करत होता. त्याच्या नराधमी कृत्याची माहिती मिळताच सहप्रवाशांनी तातडीनं रेल्वे पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली, ज्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपूर स्थानकात रेल्वे थांबवली असता ही कारवाई करण्यात आली.