Nagpur: वाघ राहील नाहीतर आम्ही! जंगलानजीक असणाऱ्या शाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात दहशत
Nagpur News: शाळेच्या परिसरात फिरणाऱ्या वाघाच्या दहशतीमुळे नागपूर जिल्ह्यातील पांजरी लोधी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळाच स्थलांतरित करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर: शाळेच्या परिसरात फिरणाऱ्या वाघाच्या दहशतीमुळे नागपूर (nagpur news) जिल्ह्यातील पांजरी लोधी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळाच स्थलांतरित करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे (education department0 करण्यात आली आहे. सध्या जंगलाला लागून असलेली ही शाळा गावातील नव्या इमारतीत जावी अशी मागणी पत्र (official letter) लिहून शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात वाघीण (tigeress and her cubs) आणि तिचे दोन बछडे यांचा वावर असल्याने शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रचंड धास्ती आणि भीती आहे. (Nagpur News Tiger Fear around Zilla Parishad School Panjari Lodhi The issue of students safety marathi news)
शाळेतील काही विद्यार्थ्यांनी तर वाघीण आणि तिच्या बछड्यांना पहिल्यापासून प्रचंड दहशतीखाली शाळेत येत आहे. नागपूर जिल्ह्यातील पांजरी लोधी (panjari lodhi) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे. गावापासून बाहेर सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेली ही शाळा अगदी जंगलाला लागून असलेल्या भागात आहे. जंगलाला लागून असलेल्या या उच्च प्राथमिक शाळेत आजूबाजूच्या गावातील मुलं शिकायला येतात.
हेही वाचा - Tea Addiction: सारखं सारखं चहा पिण्याची सवय जात नाही? करा 'हे' 3 उपाय
काय घडला नक्की प्रकार?
दरम्यान या शाळेच्या परिसरात एक वाघीण आणि तिचे दोन बछडे यांचा वावर शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहिला. शिवाय आजूबाजूचे नववारी, खातमारी गावातही वाघाने गाई बैलांवर हल्ल्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात वाघाला (tiger nagpur news) फिरताना दिसत असल्याचे समजल्यापासून शाळेतील विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली आहेत त्याशिवाय शिक्षक वर्गही घाबरत शाळेत येतात अनेक पालकही बरेच दिवस विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची घाबरत होते
या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठी दुर्घटना घडण्याआधी गावाबाहेर असलेली शाळा गावात स्थलांतरित केली जावी अशी मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. शाळेची सध्याची इमारतही मोडकळीस झाली असून वर्ग खोल्यांची दुरावस्था झाली आहे. त्याचाही विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो.विद्यार्थ्यांची हित लक्षात घेऊन या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने (education news) तातडीने लक्ष घालून पावले उचलण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
पालक-मुलांनो सावधान
सध्या अशा घटना गावातच नाहीत तर शहरातही वाढू लागल्या आहेत. शहरातही झाडी असलेल्या भागात प्राणी शिरण्याचेही प्रमाण वाढू लागले आहे त्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी वनरक्षक विभागानंही (forest department) मोठी पावल उचलणं महत्त्वाचं आहे.