नागपूर : नागपूरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. अधिवेशन सुरू असताना विधानभवनाच्या अवती-भोवती ५ ठिकाणी खास स्टॉल लावण्यात आले आहेत. नागपूर पोलिसांनी बंदोबस्तासाठी आलेल्या हजारो पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी १० रुपयांची खास थाळी सुरू केली आहे. चपाती, भाजी, भात आणि मिठाई, सलाड असे या थाळीचे स्वरूप आहे... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोज ६ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच गरम जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. ड्युटीच्या पॉईंट वर वेळेत जेवण मिळत असल्याने महत्वाची सेवा उपलब्ध झाल्याची भावना पोलीस कर्मचाऱ्यानी व्यक्त केली आहे.


म्हणून सत्तेत असलेल्या शिवसेनेची १० रुपयांची थाळी जरी अजून सुरू झाली नसली... तरी नारपूरात बंदोबस्तासाठी आलेल्या हजारो पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी १० रुपयांची खास थाळी सुरू करण्यात आली आहे. 


त्यामुळे आता राजकारण्यांच्या थाळी आधीच पोलिसांची थाळी सुरू झाल्याचे चित्र नागपूरात पाहायला मिळत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारचा आजपासून खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. 


नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. ठाकरे सरकारचं हे पहिलं अधिवेशन केवळ सातच दिवसांचं असणार आहे. शेतकरी कर्जमाफी, स्थगित केलेले प्रकल्प, खातेपाटप यांसारख्या मुदद्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडित पकडण्याची शक्यता आहे.