अमर काणे, झी मीडिया, नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृतवर्षानिमित्त 108 तासात रस्त्याच्या 2 लेनमध्ये 75 किमी बिटूमिनस काँक्रीट टाकून रस्ता बनवण्याची तयारी सुरु आहे. बिटूमिनस काँक्रीटचा हा सर्वात लांब अखंड रस्ता तयार करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न विदर्भात सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती जिल्ह्यातील लोणी ते अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर दरम्यान या रस्त्याची निर्मिती करण्यात येणार आहे. 


बिटूमीनस काँक्रीट रस्त्याचा विक्रम - 


बिटूमीनस काँक्रीट टाकत रस्ते निर्मितीचा विक्रम कतारच्या दोहा येथील एका कंपनीच्या नावावर आहे. त्यांनी 25 किमीचा रस्ता साडे सहा दिवसांमध्ये तयार केला होता. 


विक्रम बनवण्यासाठी इतक्या कर्मचाऱ्यांची फौज - 


718 कर्मचारी 3 शिफ्टमध्ये 5 दिवस अहोरात्र काम करण्यासाठी राहणार आहे. 3 जूनपासून सकाळी 7पासून मिशनला सुरुवात होणार आहे. या रस्त्याचे काम राजपथ इन्फ्रा कंपनी करणार आहे.याबाबत कंपनीचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी माहिती दिली आहे. यासाठी 34 हजार मेट्रिक टन बिटूमिनस काँक्रीटचा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी सांगली-सातारा भागात 24 तासात 39 किलोमीटरचा रस्ता बांधण्याचा विक्रम केला होता. आता या नव्या विक्रमसाठी 2 महिन्यांपासून खास तयारी केली आहे.