Pune - Ahmednagar - Sambhajinagar Expressway : राज्यभरात महामर्गाचे जाळे तयार केले जात आहे. या महामार्गामुळे नागपूर ते संभाजीनगर हे अंतर चार तासात आणि तिथून पुणे हे अंतर अवघ्या दोन तासात पूर्ण करता येणार आहे.  पुणे - अहमदनगर - संभाजीनगर अशा 230 किलोमीटर लांबीच्या सिक्स लेन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे साठीचा सामंजस्य करार नागपुरात पार पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्राच्या रस्ते परिवहन व महामार्ग विभाग तसेच महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात हा सामंजस्य करार झाला आहे. या नव्या सिक्स लेन एक्सप्रेसवे मुळे पुण्याची समृद्धी महामार्गासोबत कनेक्टिव्हिटी निर्माण होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार झाला. 


पुणे - अहमदनगर - संभाजीनगर महामार्गावर सहा टोल - नितीन गडकरी 


पुणे - अहमदनगर - संभाजीनगर  या रस्त्यावर सहा टोल असणार आहेत.  त्यामुळे उत्पन्न चांगले मिळेल.  कदाचित शंभर कोटी रुपये दर महिन्याला उत्पन्न. मिळले.  या रस्त्यासाठीचा खर्च काढून अतिरिक्त भांडवल उभे करता येईल. कारण या मार्गावर वाहतूक खूप राहणार आहे असे गडकरी म्हणाले.  या नव्या मार्गावरून नागपूर ते संभाजीनगर 4 तासात आणि तिथून पुणे 2 तासात जाता येईल.  पुण्यापासून नगर मार्गे संभाजीनगरला रस्त्यावरील अतिक्रमण काढून आजू बाजूला सर्व्हिस रोड बनवा. नवा बांधला जाणारा मार्ग उत्तम बनवा.  जुन्या रस्त्याशी नव्या रस्त्याला जोड रस्ता ही द्या.   या रस्त्याच्या बाजूला बीड आणि नगर जिल्ह्याचे जे दुष्काळी भाग आहे  नव्या औद्योगिक वसाहती तयार करा  अशा सूचना नितीन गडकरी यांनी केल्या. 


समृद्धी महामार्ग गोंदिया व गडचिरोली पर्यंत विस्तारित करणार 


संभाजीनगर पासून पुणे पर्यंत ग्रीनफिल्ड हायवे तयार होत आहे. संभाजीनगर ते नगर आणि नगर ते पुणे प्रचंड संख्येने वाहने धावतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे हा नवा रस्ता आवश्यक होता. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग झाल्यानंतर पुण्याला समृद्धी महामार्गाशी कनेक्ट करणे आवश्यक होते.. या नव्या मार्गामुळे ही काँनेक्टिव्हिटी तयार होईल. नागपुरातून सहा ते सात तासात पोहोचणे शक्य होईल. समृद्धी महामार्ग गोंदिया व गडचिरोली पर्यंत विस्तारित करणार असल्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.