नागपूर : 'राष्ट्रीय सेविका समिती'च्या माजी प्रमुख संचालिका उषाताई चाटी यांचे दीर्घ आजारानं निधन झालंय. त्या ९१ वर्षांच्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उषाताई चाटी या समितीच्या तिसऱ्या प्रमुख संचालिका होत्या. हिंदू मुलींच्या शाळेत दीर्घकाळ शिक्षिका राहिलेल्या उषाताईेंचे १९८४ पासून वास्तव्य नागपूरच्या अहिल्या मंदिरात आहे. 


'अहिल्यादेवी स्मारक समिती'च्या कार्यवाहिका असताना त्यांनी अहिल्या मंदिरात सेवा प्रकल्प म्हणून 'वनवासी कन्या छात्रवास' प्रारंभ केला होता. या छात्रवासात ईशान्य राज्यातील ४२ मुली सध्या शिक्षण घेत आहेत.


त्यांनी राष्ट्र सेवा समितीचे उत्तर प्रदेशमध्ये काम केलंय. महिलांसाठी अतिशय प्रतिकूल परिस्थिती असलेल्या ठिकाणी त्यांनी काम केले. १९९४ ते २००६ दरम्यान त्या समितीच्या प्रमुख संचालिका होत्या. 


गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.