हिवाळी अधिवेशन : काय म्हणाले विरोधक आणि सत्ताधारी?
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात आज मंत्र्यांनी काय उत्तरं दिली, आणि विरोधकांनी काय सवाल उपस्थित केले याचे अपडेट वाचा
दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : नागपुरातील हिवाळी अधिवेशनात आज मंत्र्यांनी काय उत्तरं दिली, आणि विरोधकांनी काय सवाल उपस्थित केले याचे अपडेट वाचा... थोडक्यात खालील प्रमाणे
ऊर्जामंत्र्यांची विधानसभेत विनंती
राज्यात वीजेची ३० हजार कोटी रुपयांची थकबाकी
शेतकर्यांकडे कृषी पंपांचे २२ हजार ०४३ कोटी थकबाकी
घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांकडे ४ हजार ०९७ कोटी थकीत
नळ पाणी योजनांकडे १५५९ कोटी थकीत
- स्ट्रीट लाईटचे ३२४० कोटी रुपये थकीत
शेतकर्यांना थकीत वीजबिल भरण्याचे ऊर्जामंत्र्यांची विधानसभेत विनंती
३० हजार रुपयांच्या आत थकबाकी असेल तर ३ हजार तातडीने भरावे उर्वरित रकमेचे ५ हप्ते पाडून दिले जातील
३० हजार रुपयांच्यावर थकबाकी असेल तर ५ हजार रुपये तातडीने भरावे उर्वरित रकमेचे हप्ते पाडून दिले जातील
राज्यात २४ तास वीज पुरवठा करण्यासाठी ३० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आवश्यकता
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती
- राज्यात २ लाख १८ हजार कृषी वीज कनेक्शन प्रलंबित
येत्या १५ दिवसात ही कनेक्शन देण्यासाठी योजना आणणार
राज्यातील ४० लाख कृषी पंप सौर ऊर्जा युनिटवर आणणार
पुढील दोन वर्षांत यातील ५ लाख कृषी पंप सौर ऊर्जेवर योजना
शाळा, नळ पाणीपुरवठा योजनाही भविष्यात सौर ऊर्जेवर आणणार
शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देणं शक्य नाही
शेतकऱ्यांची थकबाकी वसुलीत अडथळे आणू नका, आंदोलन करू नका
ऊर्जामंत्र्यांचे विधानसभेत सर्व आमदारांना आवाहन
पुढील दीड महिना चुकीच्या बिलांची दुरुस्तीही करणार
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले...
राज्यात ४२ लाख हेक्टरवर बीटी कापसाची लागवड झाली आहे
या कापसावर मोठ्या प्रमाणावर बोंड अळी आली
२० जिल्ह्यात हा बोंड अळीचा प्रादुर्भाव आहे
आमच्याकडे ५ लाख शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत
आमचे राज्य आले म्हणून बोंड अळी आलेली नाही
यापूर्वी २००७ साली बोंड अळीचा प्रादुर्भाव आला होता- फुंडकर
आपल्या सरकारने बोंड अळीबाबत काय केलं, पांडुरंग फुंडकरांचा विरोधकांना सवाल
बीटी बियाणे विकणार्या ३२ कंपन्यांच्या १५१ नमुने तपासले
यातील ११० नमुने अप्रमाणित आढळून आले असून त्याप्रकारणी कोर्ट केसेस दाखल केल्या आहेत
विना प्रमाणित बियाणे विकले गेल्याचे आढळले
यात आंतरराज्य टोळी कार्यरत असावी
सीबीआय चौकशीची केंद्राकडे मागणी - फुंडकर
याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे
महिको कंपनीचे गोदाम सील केले आहेत
तक्रारी केलेल्या ५ लाख शेतकऱ्यांना आम्ही मदत देणार आहोत
२०१६ पेक्षा यावर्षी कापसाचे उत्पादन दीडपट वाढले आहे
बोंड अळी आली नसती तर राज्यात विक्रमी कापसाचे उत्पादन झाले असते
महिको कंपनीचा २५ कोटीचा बीटी बियाणाचा साठा जप्त केला
हा साठा आऊटडेटेड होता, त्याचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठवले आहेत
हा अहवाल आल्यानंतर गरज पडली तर बियाणाचा सगळा साठा नष्ट केला जाईल
राज्यात १५० पैकी ५० कृषी विद्यालय बोगस - पाडुरंग फुंडकर
- राज्यात १५० पैकी ५० कृषी विद्यालय बोगस आहेत
ही बोगस विद्यालये बंद करणार
बोगस विद्यालये शोधण्यासाठी सरकारने खुरी समिती नियुक्त केली होती
या समितीने केलेल्या पाहणीत ५० बोगस विद्यालय आढळून आली आहेत
बोंड अळीग्रस्त शेतकर्याला तीन प्रकारची मदत मिळणार
सरकारची मदत, कंपनीकडून मदत आणि विम्याची रक्कम
अजित पवार यांचा गिरीश महाजन यांच्यावर आक्षेप
गिरीश महाजन यांनी विधानसभेत रिव्हॉल्वर आणल्याने अजित पवार यांचा महाजन यांना चिमटा
मंत्र्यांना किमान सभागृहात रिव्हॉल्व्हर घेऊन येऊ नका असे सांगा
मंत्र्याना राग आला आणि त्यांनी गोळी झाडली तर आमच्यापैकी कुणी ढगात जाईल
गिरीश महाजन जलसंपदाबाबत म्हणाले...
आमचे सरकार आल्यापासून सिंचन प्रकल्पांना गती आली आहे
मागील तीन वर्षात आम्ही राज्यात २१२ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे
यात विदर्भातील ११२ आणि मराठवाड्यातील २७ प्रकल्पांचा समावेश आहे
२०१९ पर्यंत रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार आहोत