जळगाव येथील हाफकिनचे युनिट बंद करणार नाही!
जळगाव येथील हाफकिनचे युनिट बंद करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाही, अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभा सभागृहात एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
नागपूर : जळगाव येथील हाफकिनचे युनिट बंद करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाही, अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभा सभागृहात एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
पारोळा एरंडोलचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील तसच राहूल जगताप, प्रदीप नाईक यांनी जळगांवचं हाफकिन युनिट बंद करण्याच्या निर्णयाबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात मंत्री बापट यांनी हाफकिन महामंडळाचे सहयोगी कंपनी असलेल्या हाफकिन अजिंठा फार्मा लिमिटेड, जिल्हा जळगाव युनिटमध्ये केवळ क्षार संजीवनी, प्रतिजैवके, ज्वरनाशकाची औषधे, क्षयरोग औषधे, पोटदुखी व ॲलर्जीवरील औषधे यांचे उत्पादन करण्यात येते.
या युनिटमध्ये पोलिओची लस अथवा इंजेक्शनचे उत्पादन केले जात नाही. हाफकिन व्यवस्थापकीय संचालक मंडळाकडून हाफकिनचे जळगांव येथील युनिट बंद करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.