Devendra Fadnavis on Maharashtra Karnataka Border Issue : आमचं सरकार आल्यावर सीमावाद निर्माण झाला नाही, अडीच वर्षे मुख्यमंत्री असलेल्यांनी काहीही केलं नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मारला. सीमावादाचे आम्ही राजकारण केलं नाही, असे फडणवीस म्हणाले. (Maharashtra Political News) दरम्यान, विरोधक बॉम्ब फोडणार होते. मात्र, त्यांचं फूस्स झालंय. ती लवंगी मिरची पण नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला. आमच्याकडेही खूप बॉम्ब आहेत, अशा इशारा त्यांनी यावेळी दिला.


उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांचे प्रत्युत्तर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनात सर्वात जास्त मुद्दा गाजतोय तो बॉम्बचा. आमच्याकडेही खूप बॉम्ब आहेत. वेळ आली की काढू, असा पलटवार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. त्यांच्या वाती काढल्या आहेत, फक्त त्या पेटवण्याचा अवकाश असल्याचा इशारा दिला होता. त्यालाच फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमच्याकडे बॉम्ब आहेत पण त्यांच्याकडे लवंगी फटाकेही नाहीत, असा टोला फडणवीसांनी लगावला. तेव्हा आता सत्ताधारी की विरोधक पहिला बॉम्ब फोडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. 


उद्धव ठाकरे यांच्या मागणीचा ठरावात उल्लेख नाही?


महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज सरकार ठराव मांडणार आहे. सीमावादाबाबत काल विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सरकारची कोंडी झाली. महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, असा ठराव कर्नाटक विधानसभेने गेल्या आठवड्यात एकमताने मंजूर केल्यावर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. कर्नाटकच्या आक्रमकतेला आज ठरावाद्वारे राज्य सरकार प्रत्युत्तर देणार आहे. कर्नाटक सरकारने सीमाभागात चालवलेल्या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध केला जाईल. तसेच गृहमंत्री अमित शाहांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणीबाबत कर्नाटकला समज द्यावी अशी मागणी केंद्राकडे केली जाणार आहे. मात्र सीमाभाग केंद्रशासित करावा या उद्धव ठाकरे यांच्या मागणीचा मात्र ठरावात तूर्त उल्लेख नाही.  


 'एवढे देवेंद्र फडणवीस कसे बदलले?'


 देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षाचे नेता असताना विधानसभेचा वापर भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला होता.  आज सत्तेत बसल्यावर त्यांना भ्रष्टाचाराचे प्रकरणे जी विरोधी पक्ष  काढत आहेत, ती बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत आहे. एवढे देवेंद्र फडणवीस कसे बदलले, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. 


 मी उद्धव ठाकरे  नागपूरला आलो आहे. आम्ही म्हणालो ,काही बॉम्ब फोडू. काल उद्धवजनी सांगितलं वाती तयार आहे. अजून अधिवेशन संपलं नाही, असे प्रत्युत्तर राऊत यांनी फडणवीस यांना दिलेय. दरम्यान, सीमा प्रश्नावरचा ठराव अत्यंत महत्वाचा आहे. ज्याप्रकारे ठराव तयार केला तो अतिशय सुमार आहे. त्या ठरावात  संपूर्ण प्रदेश केंद्र शासित करावा याचा उल्लेख नाही, असे राऊत म्हणाले.