मुंबई : महाराष्ट्र निसर्ग चक्रीवादळ आणि कोरोनाच्या संकटांचा मुकाबला करत असताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले बर्थडे सेलिब्रेट करण्यात मशगूल होते. कोणतंही सोशल डिस्टन्सिंग न पाळता पटोलेंनी शुक्रवारी त्यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांसह साजरा केला. केक कापत असताना नाना पटोलेंसोबत त्यांच्या समर्थकांचा आणि कार्यकर्त्यांचा गराडा होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पटोलेंच्या वाढदिवसाला आलेल्या कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्क लावलं नव्हतं. कार्यकर्त्यांच्या हातात ग्लोव्हजही नव्हते. नाना पटोलेंच्या या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचंच चित्र होतं. त्यामुळे या बर्थडे सेलिब्रेशनवर आता टीका होत आहे. कोरोना काळातला कोणताही नियम या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये पाळलेला गेला नसल्याचं दिसत होतं.