Nana Patole : नाना पटोले यांचा भाजपला टोला, `कसब्यात लोकांनी उत्तर दिलेय`
Nana Patole on Pune Bypoll Election Results : कसबा पेठ (Kasba Peth) निवडणूक निकालात महाविकास आघाडी बाजी मारताना चित्र दिसून येत आहे. (Pune Bypoll Election Results 2023) सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आघाडी घेतली आहे. त्याची आघाडी कायम आहे. यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी कसबा पेठ निवडणुकीवर आपली प्रतिक्रिया दिलेय.
Nana Patole on Pune Bypoll Election Results : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) निवडणूक निकालात महाविकास आघाडी बाजी मारताना चित्र दिसून येत आहे. (Pune Bypoll Election Results 2023) सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आघाडी घेतली आहे. त्याची आघाडी कायम आहे. यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी कसबा पेठ निवडणुकीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कसबा हा मतदार संघ कोणाचा आहे ते आता ते (भाजप) सांगू शकत नाहीत. ते गृहीत धरुन चालले होते. नेहमी सांगायचे आमचा सातबारा तिथे आहे. पण आता चित्र वेगळं आहे. लोकांनी चांगले उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. पैशाचा वापर झालेला हा पहिला निकाल आहे. पैसे वाटून लोकांना आम्ही विकत घेऊ शकतो, असं दाखवलं. पण लोकांनी उत्तर दिलं आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
निकालाआधी पुण्यात 'Who is Dhangekar?' चे लागले बॅनर्स
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना भाजपच्या बालेकिल्ल्यात अर्थात पेठेतील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या पेठेतील अनेक परिसरातून धंगेकर आघाडीवर आहेत. कसबा, शनिवार, सदाशिव, नवी पेठ काही भाग, अल्पना टॉकीज, बुधवार पेठ, रविवार पेठ, गणेश पेठ, डोके तालीम, बोहरी आळी, रामेश्वर चौक, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता या ठिकाणाहून धंगेकर यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार रोडशो केला होता. तसेच प्रचारही केला होता. मात्र, लोकांनी त्यांना नाकारले आहे, अशी प्रतिक्रिया आता कसबा पेठेत ऐकायला मिळत आहे.
भाजपची मस्ती उतरली
शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना मूठमाती करण्याचा प्रयत्न आणि विचारधारा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न राज्यपाल आणि सत्ताधारी पक्षाने केले त्याला कसबा पेठ निवडणुकीतून उत्तर मिळाले आहे. भाजपची मस्ती उतरवली गेली आहे. महागाई, बेरोजगारी यावर ही निवडणूक लढवली गेली. भाजपचे नेते फडणवीस खोट आणि रेटून बोलतात. इतर राज्यांतही काँग्रेसच्या जागा आल्या आहेत. आता NDA ची घसरण सुरु आहे. मोदी यांनी विश्वासघात केला त्याचे उत्तर दिले गेले आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.