Maharahtra Politics : उद्धव ठाकरे, अजित पवार संभाजीनगरमध्ये दाखल पण महाविकास आघाडीचा महत्वाचा नेता गैरहजर; वज्रमूठ सभा चर्चेत
MVA Sambhajinagar Sabha : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या जाहीर सभेला आता काही वेळ उरला असाताना मोठी बातमी समोर आली आहे.
MVA Sambhajinagar Sabha : महाविकास आघाडीची (Mahavikasaaghadi) वज्रमूठ सभा चर्चेत आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्ष नेते अजित पवार(Leader of Opposition Ajit Pawar) हे वज्रमूठ सभेसाठी संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) दाखल झाले आहेत. पण, महाविकास आघाडीचा महत्वाचा नेता गैरहजर आहे. काँग्रेस नेते नाना पटोले या सभेला गैरहजर राहणार आहेत. यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. प्रकृती अस्वस्थामुळे नाना पटोले सभेला गैरहजर राहणार असल्याचे समजते.
छत्रपती संभाजी नगर येथे महाविकास आघाडीतर्फे वज्रमूठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेत उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले सरकारवर तुटून पडतील अशी चर्चा आहे. महाविकास आघाडी राज्यभर संयुक्त सभा घेणार आहे. त्याची सुरूवात आजपासून छत्रपती संभाजीनगरातून होत आहे.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही होत आहे. या सभेला मिळणारा प्रतिसाद हा चर्चेचा विषय असेल. संभाजीनगरची दंगल, देशभरात पेटलेला सावरकर वाद या पार्श्वभूमीवर मविआ नेते काय बोलणार याची उत्सुकता आहे. जाहीर सभेचे फलक जागोजागी लागले आहेत. ही जाहीर सभा प्रचंड यशस्वी होईल, असा विश्वास मविआ नेत्यांनी व्यक्त केला.
नाना पटोले सभेला गैरहजर
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते नाना पटोले मात्र, या सभेला गैरहजर राहणार असल्याचे समजते. प्रकृती ठीक नसल्यामुळे नाना पटोले सभेत सहभागी होऊ शकणार नसल्याचे समजते. महाविकास आघाडीची ही पहिलीच संयुक्त सभा आहे. मात्र, पहिल्यास सभेला काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार नसल्याने राजकीय वर्तुळाता चर्चेला उधाण आले आहे.