नांदेड : प्रजासत्ताकदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारांचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी दिल्लीत वितरण करण्यात आलं. यावेळी नांदेडच्या एजाज नदाफला शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं.


एजाजनं स्वतःचा जीव धोक्यात घालून बंधा-यात वाहून जाणा-या दोघींचा जीव वाचवला होता. गावातल्या बंधा-यावर कपडे धुवायला गेलेल्या मुली पाय निसटून पाण्यात वाहून जात होत्या. त्यावेळी एजाज तिथं होता. त्यानं पोहत जाऊन या मुलींना वाचवलं होतं...