COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेड : एक निर्दयी इसम दुचाकीला बांधून एका कुत्र्याला फरफटत नेत असतांनाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. नांदेड शहारातील वाघी रोड परिसरातील हा व्हिडिओ आहे.


व्हिडिओ होतोय व्हायरल


कुत्र्याला साखळीने बांधून मुख्य रस्त्यावरून हा व्यक्ती फरफटत नेत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


कारवाईचे पोलिसांनी दिले आदेश


पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना अॅडमीन असलेल्या एका whats app ग्रुपवर देखील एका व्यक्तीने हा व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओ पाहून संबंधित व्यक्तीवर कारवाईचे आदेश पोलीस अधिक्षकांनी दिले आहेत. सध्या पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत.