मनसे किनवटच्या शहराध्यक्षाची राज ठाकरेंना पत्र लिहुन आत्महत्या
`राज साहेब मला माफ करा` अशी चिठ्ठी लिहत मनसे नेत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय.
नांदेड : 'राज साहेब मला माफ करा' अशी चिठ्ठी लिहत मनसे किनवट शहराध्यक्षाने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. नांदेडच्या किनवट तालुक्यातील मनसेचे शहराध्यक्ष सुनिल ईरावार यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. काल रात्री ही घटना घडली. आत्महत्येआधी सुनिल यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आपल्या कुटुंबियांसाठी चिठ्ठी लिहुन ठेवली होती.
'राज साहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात यावर राजकारण केल जात.आणि या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीत,असे त्याने चिठ्ठीत म्हटलंय
अखेरचा जय महाराष्ट्र... यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थीती कमकुवत असल्याने मी माझं आयुष्य स्वखुशीने संपवत असल्याचेही त्याने पुढे लिहिलंय.
सुनिल यांच्या आत्महत्येन मनसेने एक चांगल खंबाक नेतृत्व गमावल्याची प्रतिक्रिया स्थानिक देतायत.