राहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?
Loksabha Election: राज्यात पहिला टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील 40 गावांबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
Loksabha Election: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, नांदेड लोकसभा मतदारसंघातील 38 ते 40 अशी गावे आहेत जे राहतात महराष्ट्रात मात्र तेथील गावकरी मतदानासाठी तेलंगणाला जातात. याचे कारणही थक्क करणारे आहे.
नांदेडच्या या गावांत राहणारे नागरिक जास्तकरुन हिंदी, तेलगु आणि मराठी भाषेचा वापर करतात. नांदेड शहरापासून जवळपास 90 किमी अंतरावर धर्मबाग, देगलूर आणि बिलोली तहसील आहे. जे तेलंगणा राज्याच्या सीमेजवळ आहे. या गावांच्या शेजारीच तेलंगणा राज्याचे बोधान आणि निजामबाद लोकसभा मतदारसंघ आहेत. तेलगंणाच्या या दोन लोकसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्रातील अनेक गावांचे मतदार आहेत. जे तिथे जाऊन मतदान करतात. 20 वर्षांपर्यंत येग्जी गावाचे सरपंच असलेले गंगाधर लक्ष्मणराव प्रचंड म्हणतात की रेकॉर्डमध्ये आमचं गाव महाराष्ट्रात येत पण आम्ही मतदान तेलंगणा राज्याच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराला करतो.
महाराष्ट्र सरकारच्या तुलनेत तेलंगणा सरकार या गावांना अधिक सोयी-सुविधा पुरवते. राज्यापेक्षा 100 रुपये जास्त मजुरी तेलंगणा सरकार या गावातील मजुरांना देते. तिथेली शिक्षणही महाराष्ट्रापेक्षा खूप जास्त प्रभावी आहे, असं गंगाराम म्हणतात. तेलंगणाकडून मिळणारी साधने व सोयी-सुविधा यामुळंच या गावातील लोक तेलंगणा सरकारसोबत जोडलेले आहेत.
पहिली ते बारावीपर्यंत दलित, ओबीसीसारख्या समाजातील मुलांना मोफत शिक्षण आहे. तसंच, तेथील शिक्षणही अधिक प्रभावी आहे. प्रत्येक तहसीलमध्ये चांगल्या शाळा आहेत. शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या योजना आहेत. जसं की, 24 तास वीज, गरिबांसाठी 200 यूनिट वीज मोफत. तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे आणि खतासाठी 10 हजार रुपये देते.
शेतकऱ्यांसाठी पाच लाख रुपयांची सरकारी नि: शुल्क वीमा योजना आहे. दिव्यांग, बुजुर्ग आणि विधवा महिलांसाठी अनेक योजना आहेत. या सर्व योजना आणि मदत कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांशिवाय मिळतात. सरकारी अधिकारीच ही मदत देतात. तर, महाराष्ट्रात कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी पन्नासवेळा तहसीलमध्ये चकरा माराव्या लागतात. तर, तेलंगणा सरकार येथे नेहमी सर्व्हेदेखील करते, असं गंगाराम सांगतात.
तेलंगणा राज्याच्या सीमेलगत वसलेली अनेक महाराष्ट्रातील गावांचे तेलंगणा राज्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्यासोबत रोटी बेटीचादेखील संबंध आहे. गंगाराम म्हणतात की, तेलंगणामध्ये 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत आहेत. तर, ही सुविधा महाराष्ट्रात घेण्याआधी पहिले कार्ड बनवावे लागते आणि हे कार्ड बनवण्यासाठीच खूप मेहनत घ्यावी लागते. तर, तेलंगणात पहिले बाळ झाल्यानंतर सहा महिन्यांसाठी संपूर्ण सामान केसीआर किट योजनेंतर्गंत घरी पाठवण्यात येते.
पोषण आहार योजनेतर्गंत 1,500 रुपये तेलंगणा सरकार देते. दोन किंवा तीन मुली असल्या तरीही शादी मुबारक योजनेंअतर्गंत सरकार 1.16 लाख रुपयांची रोख रक्कम दिली जाते. त्यामुळं महाराष्ट्रातील ही गावं तेलंगणा सरकारशी जोडली गेल आहेत.