सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : बिडी, सिगारेट, तंबाखूच्या व्यसनाने अनेकांचा घात झालाय, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अशीच एक दुर्देवी घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. वडिलांच्या बिडीच्या व्यसनाने एकाच कुटुंबातील आई, वडिल आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील ही घटना आहे. बल्लूर इथले 52 वर्षीय सूर्यकांत संक्रप्पा हे फवारणी यंत्रात पेट्रोल टाकत होते. पेट्रोल भरत असताना त्यांच्या तोंडात पेटती बिडी होती. अचानक बिडीची ठिणगी पेट्रोल वर पडली आणि पेट्रोलचा भडका उडाला. संक्रप्पा यांना आगीने घेरले. 


संक्रप्पा यांचा ओरडण्याचा आवाज एकून त्यांची पत्नी धावत आली. पण आग विझवण्याचा प्रयत्नात त्याही आगीच्या विळख्यात सापडला. दोघांचा आवाज एकून 20 वर्षीय मुलगा कपिल धावत आला. आग विझवण्याचा प्रयत्नात कपिलही गंभीररीत्या भाजला गेल्या. तिघांवर देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्या नंतर नांदेड ला हलवण्यात आलं. 


पण तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी देगलुर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली