नांदेड : राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपातील कुरघोडीच्या बातम्या आपण नेहमी ऐकत असतो. निवडणूका तोंडावर आल्या तरी अजूनही सत्तेत असणार की वेगळं लढणार यावरच चर्चा रंगल्या आहेत. याचे पडसाद संपूर्ण राज्यभर पाहायला मिळत आहेत. सत्तेत असूनही कामं होत नसल्याने शिवसेनेच्या आमदारांवर आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आलीय. नांदेड जिल्ह्यातील हदगावचे सेना आमदार नागेश पाटील अष्टीकर यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केलीय. जिल्ह्यात सहाशेहून अधिक ट्रान्सफॉर्मर नादुरूस्त आहेत.


दीडशे गावं अंधारात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हदगाव तालुक्यातच दीडशे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्याने दीडशे गावं अंधारात आहे.


गेल्या दोन महिन्यांपासून अशीच परिस्थिती आहे.


याबाबत ऊर्जामंत्र्यांपासून सर्व स्तरापर्यंत पाठपुरावा करूनही कुणीच दखल न घेतल्याने उपोषणावर बसल्याचे अष्टीकर यांनी सांगितलंय.


दुरूस्ती सुरू 


त्यांच्यासह शिवसेना आमदार सुभाष साबने आणि आमदार हेमंत पाटील यांनीही उपोषणाला बसत सरकारच्या गलथान कारभाराचा निषेध केलाय.


ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्याचं मान्य करत २०० ट्रॉन्सफॉर्मर दुरुस्ती सुरु असल्याचे महावितरणनं म्हटलंय.