Nanded Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नांदेडमध्ये सभा होणार आहे. यासाठी ते आता नांदेडमध्ये दाखल होत आहेत. दरम्यान नांदेडमधील ठाकरे गटाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी सज्ज होते. त्यांनी उद्धव ठाकरेंचे जंगी स्वागतासाठी नांदेड विमानतळावर 21 जेसीबी आणले होते. पण हे हे जेसीबी त्यांना परत पाठवावे लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेड विमानतळावर आणण्यात आलेले 21 जे सी बी पोलीसांनी परत पाठवले. हिंगोली येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज नांदेड विमानतळावर येणार आहेत. नांदेड विमानतळावरून ते हिंगोली येथील जाहीर सभेसाठी जाणार आहेत. उद्धव ठाकरे नांदेडला येणार असल्याने शिवसैनिकांनी त्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली होती. 21 जेसीबीद्वारे वीमानतळा बाहेर त्यांचे स्वागत करण्यात येणार होते. 


उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणाहून 21 जेसीबी आणले होते. मात्र विमानतळा बाहेर जेसीबीद्वारे स्वागताला पोलीसांनी परवानगी दिली नाही. त्यामूळे आणलेले जेसीबी परत पाठवावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. 


दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नांदेड विमानतळावर येणारं आहेत. त्याच दडपणातून पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. 


दरम्यान ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी विरोधाकांवर निशाणा साधला आहे. आजची सभा शक्ती प्रदर्शन नाही, हे उद्धव साहेबांबद्दल प्रेम आहे ते सभेच्या माध्यमातून व्यक्त होतंय. जेसीबीला नांदेडमध्ये परवानगी नाकारली. हा प्रशासनाचा निर्णय आहे. मात्र असले स्वागत शो बाजी असते असे आमचे मत आहे असे ते म्हणाले. 


आता अजित पवार लोकांना शिकवतात त्यांना फूल घेऊन गेले तरी रागावतात मग त्यांना जेसीबी कसे चालतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  अजित पवारांचा तो कार्यकर्ता जेसीबीला उलटा लटकला होता. त्यावर 307 दाखल व्हायला हवा. ही शो बाजी योग्य नाही, असेही दानवे म्हणाले. सत्तेत असलेल्यांच्या डोक्यात मस्ती गेलीय. हम करे सो कायदा आहे, अशी टीका दानवेंनी केली.