नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूरात (Navapur) एका पोल्ट्री फार्ममध्ये (Poultry Farm) 20 हजार कोंबड्या मरण (20,000 chickens die) पावल्याची धक्कादायकबाब पुढे आली आहे. याबाबतची तक्रार प्रशासनाने करण्यात आली आहे. या तक्रारीत प्रथम दर्शनी तथ्य आढळून आल्याने तात्काळ उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. या कोंबड्याना बर्ड फ्लूने की राणीखेत आजाराणे मेल्या हे अहवालनंतर स्पष्ट होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कोंबड्यांच्या मृत्यूचे करण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मेलेल्या कोंबड्या या खड्ड्यात पुरण्यात आल्याची निनावी तक्रारीवरून तहसीलदार यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी आणि तलाठयांनी संबंधित पोल्ट्री फार्मवर जाऊन पंचनामा केला.



नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय योजयला सुरुवात केली आहे. मेलेल्या कोंबड्याचा अहवाल आल्यावर निदान स्पष्ट होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केले आहे. या परिसरात बफर झोन तयार करण्यात आला आहे, अशी माहिती नंदुरबारचे जिल्हाधिकारी भारुड यांनी सांगितले.