नंदुरबारमधील घोडेबाजारात कोट्यावधींची उलाढाल
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्यात दत्तजयंतीपासून सुरू झालेल्या घोडे बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येतेय. पंधरा दिवसात २ कोटी ५० लाखांची उलाढाल झालीय.
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्यात दत्तजयंतीपासून सुरू झालेल्या घोडे बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येतेय. पंधरा दिवसात २ कोटी ५० लाखांची उलाढाल झालीय.
३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या घोडेबाजारात देश भरातून ३००० घोडे विक्रीसाठी दाखल झाले होते.
पंधरा दिवसांत ८४१ घोड्यांची विक्री झालीय. मात्र, या वर्षी पहिल्या दिवसापासून घोडेबाजारात तेजी दिसून येत होती.
महिनाभरात घोडे विक्रीतून 4 कोटी पेक्षा जास्तची उलाढाल होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
घोडेबाजारात मोठ्या प्रमाणात तेजी