नंदुरबार : नंदुरबार शहरातील महाराष्ट्र विजय व्यायाम शाळेजवळ दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेत लाठ्याकाठ्यांसह हत्यारांचा वापर करण्यात आला आहे. या हाणामारीमध्ये भाजपाचे नगरसेवक आनंद माळी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रात्री नंदुरबार शहरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. शहरात सद्यस्थितीत तणावपूर्ण शांतता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून शहरात या दोन गटांमध्ये धुमश्चक्री सुरू होती. त्यातूनच ही मोठी हाणामारीची घटना घडल्याचं बोललं जातंय. पोलिसांनी या हाणामारीच्या घटनेनंतर संशयितांची धरपकड सुरू केलीय. 


शहरातील संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जिल्हा पोलीस प्रशासनानं शांततेचं आवाहन केलंय. अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मोहीमही पोलिसांकडून छेडण्यात आलीय.