SBI Bank Stampede Like Situation: नंदूरबार जिल्ह्यामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील धडगावमधील स्टेट बँकेच्या शाखेबाहेर ई केव्हायसीसाठी महिलांची एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली की तिथे चेंगराचेंगरी झाली. या घटनेमध्ये 2 महिला बेशुद्ध पडल्या आहेत. या महिलांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या बँकेबाहेर महिलांच्या 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं सांगितलं जात आहे. (दिवसभरातील महत्त्वाचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, धडगावमधील स्टेट बँकेसमोर ईकेव्हायसी करण्यासाठी आदिवासी महिलांनी आज सकाळपासूनच बँकेसमोर तुफान गर्दी केली होती. दिवस सरकत गेला तशी ही गर्दी वाढत गेली. गर्दी इतकी वाढली की महिलांची चेंगलाचेंगरी झाली. यामध्ये दोन महिलांना गुदमरल्याचा त्रास होऊ लागला आणि त्या बेशुद्ध पडल्या. गर्दीमुळे या दोन्ही महिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. 


महिलांची छेड काढल्याचाही प्रकार


धडगावमधील बँकेमध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगळी रांग नसल्याने सर्वजण एकाच रांगेत होते. त्यामुळे काही महिलांची छेड काढण्यात आल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. मात्र या छेडछाडीसंदर्भात कोणीही थेट पुढे येत पोलिसांकडे तक्रार दिलेली नाही. मात्र छेडछाड झाल्याचं महिलांकडून सांगितलं जात आहे. 


नक्की वाचा >> BJP ला धक्का! 'फडणवीसांना सांगून आलोय' म्हणत पक्ष सोडला; म्हणाले, 'तुतारी हाती घेतली तर..'


सखोल चौकशीची मागणी


सरकारी योजनांसाठी ई केवायसी करण्यासाठी शेकडो लोक या बँकेबाहेर उभे होते. भर पवासामध्ये हे लोक बँकेसमोर लांबच लांब रांग लावून उभे होते. ही रांग दीड ते दोन किलोमीटरपर्यंत गेली होती. जळगावमध्ये ही एकमेव बँक असल्याने दुर्गम भागापासून अगदी शहरामधील लोकही याच बँकेत छोट्या छोट्या कामांसाठी येतात. आदिवासींनाही याच ठिकाणी बँकेत यावं लागतं. अनेकदा आदिवासींना बँकेसमोर रात्रीही काढावा लागते. मात्र पहिल्यांदाच अशाप्रकारे बँकेबाहेर चेंगराचेंगरीचा प्रकार घडला आहे.


नक्की वाचा >> महाविकास आघाडीत एकमेकांना टोकाचा विरोध? 'त्या' मागणीवरुन ठाकरे विरुद्ध दोन्ही काँग्रेस


सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे जळगावमध्ये अन्य एखादी शाखा असावी अशी मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. तसेच घडलेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.