23 Aug 2024, 22:28 वाजता
उद्धव ठाकरे उद्या तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध करणार
Uddhav Thackeray on Maharashtra Band : मविआने उद्याचा बंद मागे घेतलाय.. शरद पवार आणि काँग्रेसनंतर उद्धव ठाकरेंनीही उद्याचा बंद मागे घेण्याची घोषणा केलाय.. बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं.. मात्र मुंबई हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवला. त्यानंतर मग शरद पवार तसंच काँग्रेसनेही बंदमधून माघार घेतली होती. उद्धव ठाकरेंनीही मग बंद मागे घेण्याची घोषणा केली. मात्र उद्धव ठाकरे स्वत: उद्या सकाळी 11 वाजता आंदोलनात उतरणार आहेत.. शिवसेना भवन चौकात तोंडाला काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन उद्धव ठाकरे आंदोलनात सहभागी होणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
23 Aug 2024, 22:21 वाजता

23 Aug 2024, 21:48 वाजता

23 Aug 2024, 20:33 वाजता
प्रविण दरेकरांची मविआने महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर प्रतिक्रिया -
- उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं, त्यांचे आभार
- राजकारण करायला वेळ आहे
- दुर्दैवी प्रसंगाचा फायदा घेऊन विकृत मानसिकतेतून राजकीय पोळी भाजणे किळसवाणे
- विरोधाला विरोध करू पण हा विरोध दुर्दैवी
- संप करून राजकीय पोळी भाजयचा प्रयत्न होता
- कोर्टाने चांगली चपराक दिली आहे
- पृथ्वीराज चव्हाण यांनी कोर्टाबाबत दिलेलं विधान या भूमिकेतून मागे घेतलं
- संविधानाच्या नावाने गळा घोटणारे हे लोक
- देर आए दुरुस्त आए
23 Aug 2024, 20:32 वाजता
ड्रग्स मध्ये कुठलाही पोलीस कर्मचारी वा अधिकारी मदत करताना आढळला तर त्याला निलंबित ऐवजी थेट बडतर्फ करण्यात येण्याचा राज्य सरकारचा निर्णय, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
23 Aug 2024, 19:02 वाजता
उद्धव ठाकरेंकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे
उद्धव ठाकरेंनी उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. आरोपींना शिक्षा देण्याची तत्परता न्यायालयाने दाखवावी असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
23 Aug 2024, 17:33 वाजता
Maharashtra Bandh: बंद मागे घ्यावा, शरद पवारांचं आवाहन
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.
हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.
23 Aug 2024, 17:15 वाजता
काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांना उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या एक दिवस आगोदर पोलिसांकडून नोटीस जारी. याप्रमाणे मुंबईत अनेक नेत्यांना, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना स्थानिक पोलिस स्टेशन कडून नोटिस दिल्याची माहिती आहे
23 Aug 2024, 16:31 वाजता
एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका
- बदलापूर प्रकरणात आरोपींना सोडणार नाही
- राज्यात काहीतरी घडविण्याचे षडयंत्र सुरू आहे
- कोर्टाने बंद करता येणार नाही असे सांगूनही विरोधक कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करत आहात
- काही जणांना मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी घाई झाली आहे. त्यातून लोकांना बंद करून वेठीस धरले जात आहे.
23 Aug 2024, 16:11 वाजता
महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी पुकारलेला महाराष्ट्र बंद बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी करणाऱ्या दोन याचिकांमध्ये सरन्यायाधीश डी के उपाध्याय म्हणाले, “आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला बंद पुकारण्यापासून रोखत आहोत”. कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. 4.30 वाजता निकाल दिला जाणार आहे.