नारायण राणे यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं, म्हणाले... म्याव म्याव आणि आता ब्या ब्या...
मालवण देवबाग येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
सिंधुदुर्ग : मालवण देवबाग येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नारायण राणे ( NARAYAN RANE ) यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेसह उद्धव ठाकरेंवर ( UDDHAV THACKAREY ) जोरदार प्रहार केला.
उद्धव ठाकरे बोलतो काय? करतो काय? आताची शिवसेना ( SHIVSENA ) ही बाळासाहेंबाची ( BALASAHEB THACKAREY ) शिवसेना राहिली नाही अशी टीका त्यांनी केलीय.
केंद्रात आणखी 50 वर्षे भाजपचीच सत्ता राहणार आहे. सर्व जाती, धर्माच्या व्यक्तींना भाजप पक्ष आपल्यात सामावून घेत आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात भाजपचा जनाधार वाढत आहे.
महाराष्ट्रात ज्याची सत्ता आहे त्याचे आमदार किती तर ५४ आणि आता पंतप्रधान पदाची स्वप्ने पहात आहे. केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी किती खासदार निवडून यावे लागतात हे तरी यांना माहित आहे का? असा सवाल करतानाच शिवसेना पूर्वी म्याव म्याव करायची. पण आता ती बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून ब्या करणारी बकरीसेना राहिली आहे असा शाब्दिक हल्ला राणे चढवला.