मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे अटकेचे पडसाद आता उमटू लागले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राणे यांच्या अटकेचा निषेध केला आहे. जे पी नड्डा यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने अटक करणे हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही. हे लोक जन-आशीर्वाद यात्रेत भाजपाला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्रस्त आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू, ही यात्रा सुरुच राहणार अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिली आहे.