मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक पोलिसांनी सकाळीच गुन्हा दाखल केला आहे. यानंतर नारायण राणेंना अटक होऊ शकते? अशी चर्चा सुरू झाली. पण आता नाशिक पोलिसांनी प्लान बदलला आहे. नाशिक पोलीस चिपळूणमधून नारायण राणेंना आता अटक करणार नाहीत. त्यांनी प्लानमध्ये मोठा बदल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरीत जाऊन नारायण राणे यांना अटक करणार आहेत. त्यामुळे नारायण राणे यांना आता रत्नागिरीत अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांनी एक तासापूर्वी पुणे सोडून रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाले. सकाळी आठच्या सुमारास नाशिक पोलिस हे नारायण राणेंना अटक करण्यसाठी कोकणाकडे रवाना झाले. रत्नागिरीत आता नारायण राणेंची सभा आहे. नाशिक पोलीस राणेंच्या सभास्थळी जाणार आणि तेथेच कारवाई करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


नाशिक पोलिसांवरही नारायण राणेंनी टिप्पणी केली होती. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. नाशिक पोलीस आयुक्त अटकेचे आदेश काढायला राष्ट्रपती आहे की पंतप्रधान अशी विचारणाही राणेंनी केली. यावर नाशिक पोलीस आयुक्तांनी दिलं उत्तर. 


जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्यात सर्वत्र गंभीर परिस्थिती आहे. याप्रकरणी अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान राणेंच्या वक्तव्याचा निषेध करत शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. राणेंनी फक्त मुख्यमंत्र्यांचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे. असं वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. 


जयंत पाटील म्हणाले, 'राणेंनी फक्त मुख्यमंत्र्यांचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे. काही लोकांचा स्तर खाली गेला आहे. अशा लोकांना महत्व देण्याची गरज नाही. भाजपला उद्धव ठाकरेंबद्दल द्वेष असेल, पण अशी भाषा वापरणं योग्य नाही.  उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयमीपणे वागले आहेत. गृहविभागाकडून सध्याच्या स्थितीबाबत माहिती घेतली जाईल, असं देखील पाटील म्हणाले. 


पाटील पुढे म्हणाले, 'आक्रमक झालेत ते केवळ शिवसैनिक नाहीत. मुख्यमंत्र्यांचा अपमान झाल्यानं जनता आक्रमक झाली. पोलिसांकडून त्यांना कंट्रोल केलं जाईल मुद्दे संपले की लोक अशी भूमिका घेतात. अशा प्रकारची स्टेटमेंट आजवर राजकारणात केली जात नव्हती. भाजपनं कशा लोकांना प्रवेश दिलाय याचा भाजपनंच विचार करावा.