रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे पोलिसांच्या ताब्यात. रत्नागिरी पोलिसांनी केली नारायण राणेंवर कारवाई. राणेंचा अटकपूर्व जामीन रत्नागिरी न्यायालयाने फेटाळला होता. नारायण राणेंना दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती देण्यात आली होती. कोणते कलम लावण्यात आले याची माहिती देण्यात आली. नाशिक पोलिसांनी नोंदवला होता गुन्हा. दिवसभरापासून नारायण राणेंच्या अटकेबाबत चर्चा सुरू होती. ज्यानंतर हाय व्होलटेज ड्रामा झाला आणि अखेर राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, राणे समर्थकांकडून अद्यापही अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला जात नसून, त्यांना ताब्यात घेतल्याचंच ते म्हणत असल्याचं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांविरोधातलं वक्तव्य अखेर भोवलं असून नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना अटक केली असून संगमेश्वर पोलीस स्टेशनला नेण्यात येत आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी ही माहिती दिली आहे.

भाजप कार्यकर्ते आणि राणे समर्थकांनी पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना हटवलं आणि ते राणेंना घेऊन निघाले.


केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला आहे. नारायण राणेंच्या संकटात वाढ होऊ शकते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावली असती असं वक्तव्य केलं. या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. नाशिक, पुणे, महाडसह अनेक ठिकाणांहून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 


न्यायालयाने नारायण राणेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता राणेंना नेमकी कुठून अटक होणार? याकडे साऱ्यांच लक्ष आहे.  नारायण राणेंवर 4 ठिकाणांहून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.