नागपूर : नारायण राणे यांचा येत्या ३१ डिसेंबरपूर्वी राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचं समजतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना तसं आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 


राणे-फडणवीस यांची भेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर अधिवेशन सुरू असताना, राणेंनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आल्याचं समजतंय. खरं तर मुख्यमंत्र्यांनी याआधीच राणेंना मंत्री करण्याचा शब्द दिलाय. 


मुख्यमंत्री शब्द पाळणार का?


मात्र गुजरात विधानसभा निवडणुका आणि शिवसेनेचा विरोध यामुळं आतापर्यंत राणेंचा शपथविधी लांबणीवर पडला. निदान आता तरी मुख्यमंत्री आपला शब्द पाळणार का, असा सवाल केला जातोय.