सावर्डे, रत्नागिरी : नारायण राणेंच्या भेटीवर शरद पवारांनी दिलखुलास प्रतिक्रिया दिलीय. सोमवारी राणेंच्या कणकवलीमधल्या घरी दोन नेत्यांची भेट झाली होती. याची 'बंद दाराआड चर्चा' अशीच बातमी झाल्याचं पवार म्हणाले. गणपतीपुळ्यात दर्शन घेतल्यानंतर पवारांनी सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कलादालनला भेट दिली... त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या... यावेळी ते बोलत होते.  


नारायण राणे आणि शरद पवार यांच्या भेटील सदिच्छा भेट असं याला नाव देण्यात आलं असलं तरी यातून वेगळी समीकरणं तयार होत आहेत का? अशी चर्चा आहे. यामागे दोन महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. पहिली म्हणजे निलेश राणे लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदूर्गाच्या तिकीटासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार असल्याचा दावा राष्ट्रवादीनं म्हटलंय. काँग्रेससोबत झालेल्या जागा वाटपाच्या बैठकीत राष्ट्रवादीनं केला होता. त्यामुळेच राणे - पवार भेट महत्त्वाची ठरली.