COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक: इगतपुरीमध्ये गर्भवती महिलेसह तिघांवर कोयत्याने हल्ला करण्यात आले आहेत. कुटुंबीयांनी एकमेकांशीच भांडण करत हा हल्ला केल्याची माहिती आहे. गर्भवती जयश्री गतीर हिच्यासह सरिता गीते, आरती गीते, संजय गीते, कृष्णा गीते यांना कोयता, लाकडी दांडे, पाईप आणि डोळ्यात मिरची पावडर टाकून जबर मारहाण झाली आहे. 


समृद्धी महामार्गाच्या पैशाच्या वादातून घडला


विष्णू गीते, कुंडलिक गीते, लक्ष्मण गीते, पांडू गीते, काळू गीते, यादव नवले, हिरामण नवले, किशोर गोईकने, भागी गोईकने, द्वारका नवले या सगळ्यांनी अचानकपणे या सगळ्यांवर हल्ला केला. सबांधित प्रकार समृद्धी महामार्गाच्या पैशाच्या वादातून घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या कुटुंबाला समृद्धी महामार्गाला जमीन दिल्यानंतर ७४ लाख मिळाले होते. त्यावरुन या कुटुंबामध्ये वाद झाला, त्यानंतर ही मारहाण करण्यात आली. 
समृद्धी महामार्गाला जमीन देण्यात आल्याने पैसे मिळाले होते, मात्र सर्वांना समान हिस्सा न मिळाल्याने कुटुंबियांमध्ये वाद आहे.