नाशिककरांचा महाराष्ट्रातील विमानप्रवास बंद
नेमकं असं का झालंय? त्यामागची कारणं पाहुयात...
नाशिक : महाराष्ट्रातल्या 'उडान योजने'तून अखेर 'एअर डेक्कन'नं माघार घेतलीय. नाशिकहून मुंबई नाशिक पुणे नाशिक आणि जळगावहून मुंबई जळगाव अशी सेवा तांत्रिक अडचणीमुळे कायमस्वरूपी बंद करण्यात आलीय. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली होती.
मात्र, अनेक तक्रारी सातत्यानं उशिरा येणारी आणि रडतखडत सुरू असलेल्या या सेवेबद्दल सर्वाधिक तक्रारी होत्या.
आता अखेर ही सेवा बंद झाल्यानं केवळ नाशिक दिल्ली या सेवेवर नाशिककर प्रवास करू शकणार आहेत.
उडाण योजनेला नाशिकमध्ये घरघर लागलीय...नेमकं असं का झालंय? त्यामागची कारणं पाहुयात...
नाशिकचा राज्यांतर्गत हवाई संपर्क तुटला
- २३ डिसेंबर २०१७ - पहिली एअर डेक्कन सेवा सुरू झाली
- नाशिक-मुंबई-नाशिक तसंच पुण्यासाठी सेवा
- तांत्रिक अडचणींमुळे सेवा बंद - एअर डेक्कनची घोषणा
- मुंबई, पुणे, जळगावला जाणारी विमानं बंद
- हिंदुस्तान एरोनॉटिक्स ओझरमधील वाहतूक खर्च वर्षभरापासून दिलेला नाही
- हवाई कंपन्यांच्या अहवालात एअर डेक्कन सेवेला निचांकी गुणांकन