नाशिक : नाशिक महापालिका हद्दीतील अंबड लिंक रोडवरील डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या शाळेच्या अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचा प्रस्ताव पालिका आयुक्त यांनी नामंजूर केलाय. इतकंच नव्हे तर या शाळेसाठी महापालिकेने दिलेला मोकळा भूखंड ताब्यात घेण्यासाठीही नोटीस बजावण्यात आलीये. विरोधी पक्ष नेत्यांच्या शाळेचे अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस बजावल्यानं एकच खळबळ उडलीय. यामुळे डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या अंबड लिंक रोडवरील शाळेतल्या एका इमारतीवर हातोडा मारण्याची तयारी सुरू झालीय. 


राजकीय नेते विरूद्ध आयुक्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 यामुळे पुन्हा एकदा राजकीय नेते विरुद्ध आयुक्त मुंडे असा सामना नाशिक शहरात येत्या काळात रंगणार आहे. या शाळेत नर्सरी ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जातं.


इमारतीला  पहिला दाखला २००२ तर दुसरा दाखला २०१२ मध्ये नगररचना विभागाने दिला आहे. तिसऱ्या इमारतीसाठी कम्पाउंडिंग पॉलिसीअंतर्गत अर्ज दाखल करण्यात आलाय.


सारेच हादरले 


 पॉलिसीची मुदत असताना आणि छाननी अपूर्ण असतानाच आयुक्तांनी आपल्या अधिकारात हा विषय नामंजूर केल्यामुळे विश्वस्तांपासून तर मुख्याध्यापकापर्यंत सारेच हादरले आहेत. शाळा व्यवस्थापनाने  भाजप पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतलीये.